संतापजनक..! शहिदांच्या श्रद्धांजली सभेत काँग्रेसने उधळल्या नोटा

Foto

उत्तराखंड मध्ये शाहिद जवानांच्या श्रद्धांजली सभेत काँग्रेस कार्यकर्त्यांनी नोटा उधळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. उत्तराखंड मधील एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे सुपुत्र वीरेंद्र रावत यांच्यावर काँग्रेस कार्यकर्ते पैसे उधळत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे.

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट आहे. जो तो आपापल्या परीने शाहिद जवानांना श्रद्धांजली  करत आहे. अशाच एका श्रद्धांजली सभेचे आयोजन काँग्रेसने केले होते. यामध्ये गायकांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. स्टेजवर गायक गाणी गात  असताना माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत स्टेजवर येतात. यानंतर कॉग्रेस कारकर्ते त्यांच्यावर पैसे उधळत असल्याचा व्हिडीओ ANI या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे. या विडीओमध्ये वीरेंद्र रावत यांच्या चेहऱ्यावर कुठलेही दुःखद भाव दिसत नाहीत. सोशल मीडियावर हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून काँग्रेसला मोठ्या  प्रमाणात ट्रोल केलं जात आहे.